Lok Sabha Election 2024 : सस्पेन्स संपला! उत्तरेत ‘हे’ दोन नेतेच देणार काँग्रेसला ‘न्याय’...
- Anant Suralkar
- Feb 16, 2024
- 1 min read
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित इंडिया आघाडीचा घाट घातला. पण एकीकडे काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना अनेक मित्र साथ सोडून जात आहेत. प्रामुख्याने काँग्रेसला उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे. तिथेही धक्के बसत असताना दोन बड्या नेत्यांनी मात्र काहीसा दिलासा दिला आहे.