Nashik City Police : हुक्का पार्टीच्या धुराचा नाशिक पोलिसांना ‘ठसका’
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
नाशिक तालुका पोलिसांनी गंगापूररोड भागातील एका शांत जागेतील हॉटेलवर कारवाई केली. संशयितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, यानंतर एका महिलेची एन्ट्री झाली. 'आपने किससे पंगा लिया आपको पता नही,' अशी धमकी दिली. महिलेनंतर लागलीच एका लोकप्रतिनिधीचे पीए धावपळ करीत आले. ‘खास’ पदाधिकाऱ्याचा दबाव पाहता पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून प्रकरण वाढू दिले नाही. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, ती महिला कोण आणि ते पीए कोणाचे, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
