Parshuram Uparkar : काँग्रेसनंतर मनसेलाही खिंडार; 'हा' बडा नेता लवकरच सत्ताधारी पक्षात जाणार
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळाव्यात आपल्या पुढील राजकीय भूमिकेची सूतोवाच केल आहे. अलीकडेच मनसे नेते शिरीष सावंत यांनी एका पत्रकाद्वारे परशुराम उपरकर यांचा आता मनसेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता उपरकरांनी भूमिका स्पष्ट केली. आपणच मनसेला सोडचिठ्ठी देणार होतो, असे म्हणत उपरकरांनी राज्यातील सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सिंधुदुर्गात आहे.
