top of page

आमिषाला बळी पडू नका,अन्यथा ५ वर्षे जातील वायालोकशाही वाचविण्यासाठी कमळाला धडा शिकवा, पंजाला मतदान कराविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जनतेला केले आवाहन

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 17, 2024
  • 2 min read

ree




*चामोर्शी - कोणत्याही आमिषाला बळी पडू नका,अन्यथा ५ वर्षे वाया जातील.

लोकशाही वाचविण्यासाठी कमळाला धडा शिकवा, पंजाला मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चामोर्शी येथील जनतेला केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात पार पडली, त्यावेळी ते नागरिकांना संबोधित करताना बोलत होते.

या रॅलीचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, रा. कॉ. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , काँग्रेस अनु.जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे तथा काँग्रेसचे वैभव भिवापुरे, नितिन वायलालवार, विनोद खोबे, हरबाजी मोरे, चारूदत्त पोहाणे, युवक काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस इंडिया अलायन्स व तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने रॅली सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रचाराच्या अंतिम दिवशी चामोर्शीत रॅली नंतर सांगता सभा पार पडली. सांगता सभेत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी गेल्या दहा वर्ष तुमचा खासदार तुम्हाला भेटला का, तुमच्या समस्या सोडवल्या का असा सवाल नागरिकांना केला.त्यामुळे यावेळी परिवर्तन करावेच लागेल, असे सांगत गडचिरोली चिमूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.

सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रचार संपत आहे आता जबाबदारी मतदारांची आहे. देशातील सत्ताधारी भाजपचे जुमलेबाज सरकार हे गेले दहा वर्ष तुमच्याशी खोटे बोलले, नुसती आश्वासन दिली. यावेळी मात्र कमळाला धडा शिकवला पाहिजे.

गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे जनतेच्या समस्या सोडवण्यात स्पशेल अपयशी ठरले आहे. आज काही वाटप होईल, पुन्हा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे जनतेने सावध राहील पाहिजे..आता पुन्हा तिचं चूक केली तर अजून पाच वर्ष वाया जातील त्यामुळे यावेळी पंजाला निवडून द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

bottom of page