मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमातील सुरुवात अत्यंत वाईट झालीय. मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात होम ग्राउंडमध्ये विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजायासाठी 235 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून मुंबईकर पृथ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हीड वॉर्नर या दोघांनी ओपनिंग केली आहे.