top of page

खानापुरात निवडणुकीचे पडघम, गोपीचंद पडळकरांचे काय...

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Feb 18, 2024
  • 2 min read

Breaking News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवरील बंदी हटवली

20 फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षण मिळत का? याची वाट पाहणार, मनोज जरांगेंचं विधान

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार

रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढविणार, अजित पवारांची घोषणा

नवी मुंबईत आज राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर

पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : खानापुरात निवडणुकीचे पडघम, गोपीचंद पडळकरांचे काय...

अनिल बाबर यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या जागेसाठी होणाऱ्या

ree

पोटनिवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची भूमिका काय? याची चर्चा सुरू झाली आहे.आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे खानापुरात निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभेनंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. मात्र, खानापुरात पुढचा आमदार भाजपचा असेल, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वारंवार जाहीर भाषणातून सांगितले होते. त्यांचा हा रोख अनिल बाबर यांच्याकडे राहिला, पण अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. त्यांच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पडळकर यांची भूमिका काय? याची चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गट शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे 31 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगास खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने कळवली आहे. त्यामुळे लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

खानापूर मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून खानापूर व आटपाडीमधील नेत्यांमध्ये राजकीय वाद उफाळून आला होता. त्याचे पडसाद पोटनिवडणुकीत उमटणार काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

bottom of page