धान उत्पादकांसाठी परिणय फुके ठरले 'देवदूत'
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिणय फूके हे देवदूत ठरले असून त्यांच्या अथक प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या पदरी मोठी मदत मिळाली आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांना हेक्टरी 27 हजारांची मदत मिळणार आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारमुळे हे शक्य झाल्याचा दावा परिणय फूके यांनी सरकारनामा सोबत बोलताना स्पष्ट केले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाची भरपाई दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्रित निर्णयामुळे हे शक्य झाल्याचे परिणय फूके म्हणाले.भंडारा गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांवर आलेले आसमानी संकट लक्षात घेता या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासन स्तरावर योग्य मोबदला मिळावा,अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान या मागणी चा पाठपुरावा करत माजी मंत्री भाजप नेते डाॅ. परिणय फूके यांनी सरकार समोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मागितली.
