top of page

पश्चिम महाराष्ट्रात पॉवर गेम: भाजपची डोकेदुखी वाढणार

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 18, 2024
  • 1 min read

ree

सोलापुर / पुणे,दिनांक 18 एप्रिल 2024 :  महाराष्ट्रात शरद पवारांच्या डावपेचामुळे  महायुती अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. शरद  पवारांनी भाजपला धक्का देत माढ्याच्या जागेवर चुरस निर्माण केली आहे.

पुणे/सोलापूर: धैर्यशील मोहितेंनी हाती तुतारी देऊन  शरद पवारांनी आपली खेळी खेळली . भारतीय जनता पक्षानं  माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर  यांना पुन्हा संधी देत भाजपनं बाजी मारली होती . पण त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि शरद पवारांनी याचाच फायदा घेऊन डाव साधल. धनगर नेते उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूला करुन पवार माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का देऊ शकतात.

उत्तमराव जानकरांची माढ्यातून लोकसभा लढण्याची  ईच्छा होते  व  पक्षानं आपल्याला कामाला लागण्याचे आदेशही  दिले होते, असं जानकर सांगतात. मात्र प्रत्यक्षात भाजपनं नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे जानकर मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यांची काल पवारांसोबत चर्चा झाली. त्यांनी लोकसभेला पाठिंबा द्यायचा  त्याबदल्यात विधानसभेला माळशिरसमधून उमेदवारी अशी तडजोड या बैठकीत  झाल्याची  चर्चा सुरु आहे.

 
 
bottom of page