top of page

पहिल्या टप्प्यातील रणधुमाळी शांत

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 18, 2024
  • 1 min read

ree

नागपुर, दिनांक 18 एप्रिल 2024 :  पहिल्या टप्प्यातील नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागातील प्रचार दुपारी तीन वाजता थांबला. २१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे .  तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या.

 
 
bottom of page