बाळासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी नांदेडला जाहीर सभा
- Anant Suralkar
- Apr 17, 2024
- 1 min read

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची 19 एप्रिल शुक्रवारी दुपारी एक वाजता नवा मोंढा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उमेदवार अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, राजेश्वर पालमकर, श्याम कांबळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
दुसरा टप्प्यात होत असलेल्या, नांदेड लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मतदार संघ पिंजून काढत आहेत. भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत खरी लढत होत आहे भाजपातर्फे गृहमंत्री अमित शहा यांची मोठी सभा झाली. तर काँग्रेस कडून अजूनही सभेचे आयोजन करण्यात आलेलं नाही.19 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी एक वाजता नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सभेला किमान एक ते दीड लाखांच्या संख्येने उपस्थित राहील अशी आशा संयोजकांनी व्यक्त केली आहे