बोधडी मध्ये सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक प्रतिस्पर्धेमधून दिली टीप
- Anant Suralkar
- Apr 17, 2024
- 1 min read
नांदेड : जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात किनवट तालुक्यातील बोधडी येथे रेल्वे अंडर ब्रिज खालून जाणाऱ्या एका सराफी व्यापाऱ्याला रोखून त्याची लूट करणाऱ्या तीन दरोडेखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या एकूण90% ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांना टीप देणाऱ्या दुसऱ्या एका सराफी व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात 28 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बोधडी तालुका किनवट येथील सराफी व्यापारी दत्ता शहाणे हे सोन्या-चांदीचे दुकान बंद करून ऐवज आणि रोख रक्कम घेऊन आपल्या घराकडे जात असताना रेल्वे अंडर ब्रिजखाली दबा धरून बसलेले तिघांनी त्यांना रोखून त्यांच्याकडील सोने ,चांदी रोख रक्कम सात लाख 58 हजार 655 बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी किनवट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आला होता. या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली होती. या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराये यांना आदेशित केले. पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. साधारणतः तीन महिने या पथकाने बोधडी,किनवट,माहूर परिसरात मुक्काम केला. त्यानंतर कुठे 17 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार दत्ता शहाणे यांचा एक मित्र बाबुराव त्रिंबक शहाणे हा दत्ता शहाणे यांच्यावर रागात होता. शेजारीच दुकान का टाकले म्हणून या दोघात बेबनाव निर्माण झाला होता. याच माहितीचा आधार घेऊन, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारक्या तानाजी सोळुंके अकोली तालुका उमरखेड हंगामी आबादी बोधडी, संतोष शिवाजी मुंडे, शिवशंकर नगर गोकुंदा तालुका किनवट आणि बापूराव त्र्यंबक शहाणे सराफी व्यापारी बोधडी या तिघांना पकडले. पोलिसांनी या तिघांकडून सोने चांदी आणि रोख रक्कम सहा लाख ते वीस हजार असे एकूण सहा लाख 53 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराये, आनंद बिचेवार उपस्थित होते