top of page

मुंबई इंडियन्ससाठी चांगली बातमी, हा बडा खेळाडू आता मैदानात उतरणार

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 7, 2024
  • 1 min read

ree

आयपीएल 2023 मधील 16 सामन्यात सूर्यकुमार यादवे 605 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आयपीएल डेब्यू मुंबई इंडियंसकडून केला होता. आयपीएल 2012 मध्ये मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार याला 10.00 लाख रुपयांत घेतले होते.आयपीएल 2024 मध्ये रोमांच वाढत आहे. चौकार, षटकारांची अतिषबाजी पाहण्यास क्रिकेटप्रेमींना मिळत आहे. परंतु क्रिकेट प्रेमींचे लक्ष असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून सूर गवसला नाही. मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर रविवारी चौथा सामना होत आहे. हार्दिक पांड्या याच्या कर्णधारपदाखाली पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ आज प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या संघासाठी चांगली बातमी आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आज खेळणार आहे. सूर्यकुमार यादव आता पूर्ण फिट झाला आहे. यामुळे प्लेइंग इलेवनमध्ये त्याचा समावेश असणार आहे.

 
 
bottom of page