'राऊतांनी जिभेला लगाम घालावा; अन्यथा कोरी करकरीत कोल्हापुरी पाठवू'
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कोल्हापूर हे गोड गुळाबरोबर कोल्हापुरी चप्पलसाठीही प्रसिद्ध आहे. राऊतांनी आपल्या जिभेला लगाम लावला नाही तर नवी कोरी, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल भेट द्यावी लागेल, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राहून शिंदे यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. ते वेडे झाले असून त्यांच्यावर इलाज करण्याची गरज आहे, अशी कडवट टीका राऊतांनी केली होती
