राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज
Anant Suralkar
Apr 7, 2024
1 min read
राज्यातील वातावरणात अनेक बदल दोन दिवस दिसणार आहे. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील देखील तापमान जाणार 40 अंशाच्यावर जाणार आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाहीलाही होणार आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील 48 तासांतमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.