रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड या जोडीने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. रोमरियो शेफर्ड याने 20 व्या ओव्हरमध्ये केलेल्या 32 धावांच्या जोरावर मुंबईला 230 पार मजल मारता आली. तसेच मुंबईने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 96 धावा केल्या. मुंबईने 234 धावांसह वानखेडे स्टेडियम या आपल्या होम ग्राउंडमध्ये इतिहास रचला. मुंबई आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली.