विराट कोहलीने शतक झळकावलं आणि संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं
Anant Suralkar
Apr 7, 2024
1 min read
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या वाटेला चौथा पराभव आला आहे. राजस्थान रॉयल्सने 6 गडी राखून बंगळुरुचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शतकं ठोकलं. मात्र त्याची ही खेळी वाया गेली. असं एक दोनदा नाही तर तिसऱ्यांदा झालं आहे.आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहलीने आठवेळा शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 17 व्या पर्वातील पहिलं शतक विराट कोहलीने झळकावलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली.