top of page

शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज अवघ्या 10 मिनिटांत

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 7, 2024
  • 1 min read

ree

देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात..किसान क्रेडिट कार्ड देणार आधार

देशातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बँकांचा जाच कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकले आहे. सध्या देशातील दोनच जिल्ह्यासाठी ह प्रयोग करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि राज्यातील बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.



 
 
bottom of page