top of page

शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज! निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा

  • Writer: Anant Suralkar
    Anant Suralkar
  • Apr 7, 2024
  • 1 min read

ree

राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज वीज मिळणार आहे. राज्य सरकारने आज याविषयीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प पण त्यांनी सोडला. काय केली त्यांनी घोषणा..राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल. या सर्व योजनेचा घोषवारा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प ही त्यांनी सोडला. वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्वासन पण त्यांनी दिले.

 
 
bottom of page