मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना ज्या क्षणाची वाट होती, तो क्षण आला आहे. पलटणमध्ये अखेर सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. पाहा प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे?मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 20 वा सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी बोलावलं. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने दिल्ली विरुद्धच्या या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.सूर्यकुमार अखेर परतला